बी.एस्सी. अॅग्रीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर एमपीएससीची तयारी करण्यासाठी पुण्यात क्लास करणारी 23 वर्षीय युवती.. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, अथर्व राजेंद्र मेहन या 27 वर्षीय तरुणासोबत तिचे प्रेमसंबंध होते.. दोन्ही कुटुंबीयांमध्ये विवाहाची चर्चाही झाली होती.. मात्र, घटनेच्या काही दिवस आधी युवतीच्या वागण्यात बदल जाणवू लागला..घटना घडण्याच्या साधारण 15 ते 20 दिवस आधी मुलगी नेहमीपेक्षा शांत आणि गप्प राहत होती.. आईने तिच्या मैत्रिणीकडे याबाबत विचारणा केली असता, अथर्व वारंवार शारीरिक संबंध ठेवण्यासाठी आग्रह करत असल्याचं आणि तिला काही गोळ्या खाण्यास देत असल्याचं मैत्रिणीने सांगितल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे..आणि त्यानंतर आला 6 ऑगस्टचा दिवस.. युवती अथर्वसोबत बाहेर गेली.. त्याच दिवशी तिने आईला फोन केला.. अथर्व आपल्याला त्याच्या घरी घेऊन जाणार आहे, त्याला आपल्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचे आहेत आणि तो आपल्याला गोळी खाण्यास देणार आहे, असं तिने सांगितल्याचा दावा आईने पोलिसांत केला आहे..मात्र, काही वेळातच युवतीची प्रकृती अचानक बिघडली.. तिला बारामतीतील विविध रुग्णालयांमध्ये उपचारासाठी नेण्यात आलं.. डॉक्टरांकडून उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला.. मुलीच्या मृत्यूनंतर आईने अथर्ववर गंभीर संशय व्यक्त करत पोलिसांत तक्रार दाखल केली..
#crimenews #punenews #marathinews #marathibatmya #maharashtranews #maharashtrapolitics #lokmat #eknathshinde #cmdevendrafadnavis #mahayutigovernment